काँग्रेसनेगेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दलकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र याला उत्तर देताना उद्यापर्यंत मीच मोठा निर्णय घेणार असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. त्यानंतर आता संजय निरुपम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसहायकमांडने दिल्लीतून संजय निरुपम यांची पक्षातून (congress) हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीपूर्वीसंजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वासह मित्रपक्षावर टीका करूनपक्षाची शिस्तभंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती.बुधवारी सायंकाळी त्यांचीसहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टीकरण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेसनेपाठवलेल्या प्रस्तावावर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीतातडीनेमंजुरी दिली. त्यानंतर पक्षाकडून पत्रक काढून संजय निरुपम यांची सहा वर्षासाठीहकालपट्टी केल्याचं जाहीर केले.
काँग्रेसचेराष्ट्रीय सचिव के. सी वेणुगोपाल यांच्या सहीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये लिहिले आहे की,पक्षाची शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांना तातडीनं ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याला मान्यता दिली आहे. बुधवारी दुपारीचप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निरुपम यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले होते.त्यापूर्वी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरुपम यांचंनाव हटवल्याने त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई कधीही होऊ शकते, अशी शक्यता होती. त्यानुसार अखेर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतीलसहा लोकसभा मतदारसंघापैकीउत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम इच्छुक होते. ही जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यानंतर येथून अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर निरुपम यांनी ठाकरे गटासह अमोल किर्तीकरांवर खिचडी चोरीचे आरोप केले. काँग्रेसवर टीका करताना निरुपम म्हणाले की, काँग्रेस ठाकरे गटापुढे नमली आहे. यामुळे पक्षाचे अस्तित्व संपेल. युपीप्रमाणे मुंबईतही काँग्रेसची बिकट अवस्था होईल.
एका कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम म्हणाले की, आमचे नेते थकले असून पक्ष कसा उभा राहणार हा प्रश्नच आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं विसरली आहे. गेल्या चार-पाच वर्षात काँग्रेस एकाही मुद्द्यावरून रस्त्यावर उतरली नाही. केवळ ट्विटरवरून आंदोलने होत आहेत.
संबंधित बातम्या