CM Devendra Fadnavis: २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या सत्तासंघर्ष आता थोडासा शमला असला तरी राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच असते. जर २०१९ प्रमाणे २०२४ च्या निवडणुकीतही कोणलाच इतका बहुमत मिळालं नसते, तर राज्याच्या राजकारणाचं चित्र काही वेगळंच दिसलं असते. आता राजकीय वातावरण कूस बदलताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घेरणारे विरोधी नेते आता त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेते मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे कौतुक करत असतानाच दुसरीकडे शरद पवारांनीRSSबाबत गौरवोद्गार काढत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यूबीटीने आपले मुखपत्र'सामना' मधूनफडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला, त्यानंतर स्वत:उद्धवआणिसंजय राऊत यांच्यात जणू फडणवीस कसे चांगले काम करत आहेत, हे सांगण्याची स्पर्धाच लागली. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली. सामनाच्या संपादकीय लेखात फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची प्रसंसा करत हे विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. यावर चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मुक्तकंठाने फडणवीसांची प्रसंशा केली.
शिवसेनेच्यामुखपत्र'सामना' मध्ये फडणवीसांबाबत लिहिले गेले की, त्यांनी नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोली सारख्या नक्षल प्रवाभित जिल्ह्यात विकास कार्याने केली, ही कृती अन्य नेत्यांसाठी आदर्श घालून देणारी आहे. विशेष म्हणजे एक दिवस आधीच सामनामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांना “डिप्रेशन” मध्ये असल्याचे म्हटले होते. या बदलत्या भूमिकेने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत की, हे केवळ फडणवीसांच्या कामाचे कौतुक आहे की, अन्य काही मोठ्या घडामोडींचे संकेत आहेत?
सामनाच्या संपादकीय लेखात कौतुक केल्यानंतर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की,त्यांचा पक्ष नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करत आला आहे. फडणवीस यांनी गडचिरोली येथे जे केले ते राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राऊत यांनी असेही म्हटले की, आमची टीका रचनात्मक असते, चांगल्या कामाचे आम्ही कौतुकही करतो. दुसरीकडे एनसीपी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही फडणवीसांचे कौतुक करताना म्हटले की, सध्याच्या सरकारमध्ये जर कोणी काम करत असेल तर ते केवळदेवेंद्र फडणवीस आहेत.
अशा प्रश्नावर हसतमुख होऊन उत्तर देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या कौतुकावर संयमित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, मी सर्वांना धन्यवाद देतो, ज्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. गडचिरोलीमध्ये विकासाची केवळ सुरुवात आहे, आमचा उद्देश्य आहे की, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकासांची गंगा पोहोचावी. दरम्यान एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची नरम भूमिका त्यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचे म्हणत टोला लगावला.
विरोधकांच्या यु-टर्नने राज्यात अखेर काय शकते?
महाराष्ट्रातील राजकारणाच्या बदलेल्या वाऱ्यावर राजकीय विश्लेषक म्हणतात की, उद्धव ठाकरे यांची भुमिका केवळ प्रशंसा नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चाल आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या निवधानसभा निवडणुकीतील खराब प्रदर्शनानंतर उद्धव ठाकरे गट भाजपसोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशीही शक्यता आहे की, हे केवळ सामान्य राजकीय शिष्टाचाराचा भाग असू शकते. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही.
शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. शरद पवार म्हणाले,संघाकडे समर्पित स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाहीत.यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राजकारणात कधीही कायमचा मित्र व कायमचा शत्रू नसतो. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकेर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जातात, तिकडचे अजित पवार भाजप-सेनेसोबत येतात, तसे घडावे अशी इच्छा अजितबात नसते, मात्र काही होऊल सांगता येत नाही. तसेच असे अजिबात होऊ शकत नाही, असेही म्हणता येत नाही. दरम्यान राजकीय नेत्यांमध्ये झालेला बदल भविष्यातील वेगळ्या आघाडीचा शंकनाद आहे की, अन्य काही, हे लवकरच समजेल.
संबंधित बातम्या