Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राज्यात कुठेतरी काका-पुतण्यांमध्ये लढत सुरू आहे. तर, काही ठिकाणी पती-पत्नी समोरासमोर आहेत. महाराष्ट्रात अशा अनेक विधानसभा जागा आहेत, ज्या नात्यांमधील लढतीमुळे चर्चेत आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दरम्यान, संजना जाधव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या जनतेला संबोधित करताना रडल्या आहेत.
शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव या छत्रपती संभाजीनगरतील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र., मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात अनेक वादविवाद होऊन अनेक अडचणी आल्या. हर्षवर्धन जाधव यांनी याबद्दल फेसबूक लाईव्हमधून अनेकदा बोलून दाखवले. मात्र, संजना जाधव यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
संजना जाधव म्हणाल्या की, माझ्यावर अनेक संकट आलेत, पण मी बोलून नाही दाखवले नाही.माझ्या आई-वडिलांनी मला ते शिकवले नाही. लग्नानंतर मी काही सांगायला गेले की वडील म्हणायचे एक मूल झाले की हा माणून सुधरेल. नंतर म्हणाले काही दिवसांनी सुधरेल. यानंतर मी जे सहन केले, त्याचा मोबदलाा तर मला मिळाला नाही. माझ्या जागेवर कोण आणले, हे तुम्ही पाहिले. माझी जागा घेण्याचा प्रयत्नही झाला. पण तुमच्या हृदयात असलेली माझी जागा कायम राहिली. त्यांना माझी जागा घेता आली नाही, असे त्या म्हणाल्या.'माझ्या वडिलांवर आरोप झाले, आम्ही सहन केले. एखाद्या मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता, पण माझा बाप एका मुलीचा बाप आहे म्हणून तो शांत बसला', असेही त्या म्हणाल्या.
बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात आहेत. युगेंद्र यांच्यासमोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे आहेत. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून सात वेळा निवडणूक जिंकले आहेत आणि एकदा बारामतीतून खासदारही राहिले आहेत.आता अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढत असल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे.