पुणे : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी टिका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवरून वादंग झाले होते. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने देखील पडळकर यांचा समाचार घेतला होता. दरम्यान, एका माजी सैनिकाच्या मुलानेदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या विरोधात त्याने पुण्यात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.
माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचा मुलगा माधव उर्फ नितीन सूर्यकांत याने हे बॅनर पुण्यात लावले असून त्यात पडळकर यांचा निषेध त्याने केला आहे. या बॅनरमधून त्यांनी पडळकर यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. असे लिहीत माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, असे त्यांनी बॅनरवर लिहिले आहे.
दरम्यान पुण्यात लागलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून पडळकर यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत त्यांचावर टीका केली आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा... याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, असे मिटकरी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.
संबंधित बातम्या