मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena vs BJP : ‘ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर तुमची...’, शिवसेनेचं नारायण राणेंना ओपन चॅलेंज

Shiv Sena vs BJP : ‘ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर तुमची...’, शिवसेनेचं नारायण राणेंना ओपन चॅलेंज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 12:11 PM IST

Shiv Sena vs BJP : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Shiv Sena vs Narayan Rane
Shiv Sena vs Narayan Rane (HT)

Shiv Sena vs Narayan Rane : काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गोरेगावात गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. त्यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंचा एकेरी नावानं उल्लेख करून त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पेटला आहे. कारण आता शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आशिर्वादानं राणेंना मोठं केलं. परंतु त्यांना ते काहीच समजत नाही. परंतु आता उद्धव ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर याद राखा, जास्त बोलायचं नाही. तुमची शुगर आधीच वाढलेली आहे, ती अजून वाढू देऊ नका, असं म्हणत खैरेंनी थेट नारायण राणेंना इशारा दिला आहे.

मी स्पष्टपणे सांगतो, नारायण राणेंनी जास्त बोलू नये, ठाकरे कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं. याआधी तुम्ही काय होते, याचा विचार करा. याशिवाय आता तु्म्ही जे आहात ते कुणामुळं आहात, याचा विचार करा. त्यामुळं आता तुम्ही ठाकरेंवर टीका करणार असाल तर आम्हीही शिवसैनिक आहोत, आम्हालाही काहीही बोलता येतं, असं म्हणत खैरेंनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा- खैरे

एखाद्या सरपंचानं किंवा नगरसेवकानं बेकायदा बांधकाम केलं असेल तर त्याचं सदसत्व रद्द होत असतं. मग आता एका केंद्रीय मंत्र्यानं बेकायदा बांधकाम केलं असेल तर निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाई करायला हवी. कारवाईच्या भीतीनंच नारायण राणे ठाकरेंवर टीका करत असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे?

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते की, उद्धव ठाकरे कुणाच्या जीवावर गृहमंत्री अमित शहांवर टीका करत आहेत?, शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते. तेव्हापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेनेनं संघर्ष केला, त्यात उद्धव ठाकरे कुठे होते?, त्यांचं यासाठी काय योगदान आहे?, असे सवाल करत राणेंनी ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून चंद्रकांत खैरेंनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

IPL_Entry_Point