मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 22, 2024 06:49 PM IST

Manohar Joshi Admitted in Hospital: शिवसेना नेते मनोहर जोशी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Manohar Joshi
Manohar Joshi

Manohar Joshi admitted to Hinduja Hospital in Mumbai: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर जोशी यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

यापूर्वीही मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी त्यावेळी स्पष्ट केले. त्यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत.मनोहर जोशी सध्या ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरपद भुषवले. तर, १९९५ मध्ये शिवसेना भाजपाच्या युतीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

IPL_Entry_Point

विभाग