मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : जुना बॉयफ्रेंड प्रेयसीला भेटला! संतापाच्या भरात दुसऱ्या प्रियकराने कारने उडवले, पिंपरी-चिंचवडमधील घटना

Pune Accident : जुना बॉयफ्रेंड प्रेयसीला भेटला! संतापाच्या भरात दुसऱ्या प्रियकराने कारने उडवले, पिंपरी-चिंचवडमधील घटना

May 28, 2024 10:49 AM IST

Pune Pimpri-Chinchwad News : पुण्यात पोर्शेकार अपघात प्रकरण ताजे असतांना पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून एका प्रियकराने प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेंडला कार ने उडवले.

पिंपरी-चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून एका प्रियकराने प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेंडला कार ने उडवले.
पिंपरी-चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून एका प्रियकराने प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेंडला कार ने उडवले.

Pune Pimpri-Chinchwad News : पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुण्यात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शे गाडी चालवत दुचाकीला धडक देऊन दोघा तरुण आणि तरुणीचा जीव घेतला होता. ही घटना ताजी असतांना खराडी येथे एका ट्रकने दोन विद्यार्थ्यांचा जीव घेतला. तर पिंपरी-चिंचवड येथे काल रात्री प्रेम प्रकरणातून टेल्को कंपनी जवळ एक्स बॉय फ्रेंड प्रेयसीला भेटल्याचा रागातून दुसऱ्या प्रियकराने पहिल्या प्रियकराला कारने उडवले. या घटनेत आधीचा प्रियकर हा गंभीर जखमी झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Kharadi accident: पुण्यात रॅश ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच! खराडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील २ विद्यार्थ्यांना चिरडले

निलेश शिंदे असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर येथे घडली.

Nashik: वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालताना हटकलं, माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर वार

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी सुशील भास्कर काळे व जखमी निलेश शिंदे या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम आहे. मुलीचे आरोपी सुशील भास्कर काळेवर प्रेम आहे. तर निलेश शिंदे हा तिचा आधीचा प्रियकर होता. दोघांचे ब्रेक अप झाले आहे. दरम्यान, ब्रेक अप झाले असतांना देखील निलेश शिंदे हा मुलीला सारखा त्रास देत असे.

दरम्यान, ही बाब तिने सुशीलला सांगितली. दरम्यान, सोमवारी रात्री १ च्या सुमारास निलेश शिंदे हा त्याचा जुन्या प्रेयसीला दुचाकीवरून भेटायला आला. ही बाब सुशील काळेला प्रेयसीने इडली होती. नीलेश शिंदे हा टेल्को रोडवर आधीचया प्रेयसीशी बोलत थांबला होता. याच वेळी सुशील भास्करने त्याची गाडी भरधाव वेगात चालवत निलेश शिंदेच्या दुचाकीला धडक देत त्याच्या अंगावर घातली. या घटनेत नीलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी तातडीने दवाखान्यात नेले. या घटनेची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत सुशील काळे याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४