मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  EVM row: ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर विरुद्ध किर्तीकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

EVM row: ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर विरुद्ध किर्तीकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

Jun 16, 2024 06:44 PM IST

EC on EVM OTP Unlock Case: उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणी वादावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम ओटीपीने ओपन होत नाही. मतमोजणीच्या केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीने मोबाईल वापरला होता. पण ओटीपीने ईव्हीएम उघडता येत नाही. असे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या.

 निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी
निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी (ANI)

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. तसेच अमोल किर्तीवर यांनी यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यावर, आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबईतील विजयी शिवसेनेच्या उमेदवाराच्या नातेवाईकांकडे ईव्हीएम अनलॉक करणारा फोन असल्याचा दावा करणारी बातमी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या की, ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली असून ती अनलॉक करण्यासाठी ओटीपीची आवश्यकता नसते.

या मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाइकांनी ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीदरम्यान ईव्हीएमला जोडलेल्या मोबाइलफोनचा वापर केल्याच्या वृत्ताला उत्तर देताना निवडणूक अधिकारी बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

सूर्यवंशी म्हणाल्या की, ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी मोबाइलवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) लागत नाही कारण ते नॉन-प्रोग्रामेबल आहे आणि त्याच्यात वायरलेस कम्युनिकेशन क्षमता नाही. एका वृत्तपत्राने पसरवलेले हे पूर्णपणे खोटे आहे, ज्याचा वापर काही नेत्यांकडून खोटी कथा तयार करण्यासाठी केला जात आहे. मिड-डे' वृत्तपत्राला मानहानी आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, ५०५ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

मतदान अधिकाऱ्याने सांगितले की, ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाइस आहेत ज्यात आपल्या सिस्टमबाहेरील युनिट्सशी वायर्ड किंवा वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही. त्यात  कोणत्याही प्रकारचा फेरफार होऊन नये यासाठी अत्याधुनिक तांत्रिक वैशिष्ट्ये आणि भक्कम प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा उपायांमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांच्या उपस्थितीत सर्व काही करणे समाविष्ट आहे.

वाईकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर ४ जून रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा मतमोजणी केंद्रावर मोबाइल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रेकॉर्ड तपासण्यासाठी आणि इतर कारणांसाठी त्याचा वापर केला गेला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी हा मोबाइल फॉरेन्सिककडे पाठविण्यात आला आहे.

मतदान कर्मचारी दिनेश गुरव यांच्या फिर्यादीवरून पांडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर अशा उपकरणांवर बंदी असतानाही एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या नातेवाईकाने मोबाइल फोन वापरल्याचे पाहिले आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर आरओने वनराई पोलिसांशी संपर्क साधला. पांडिलकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह -

उपस्थित केले 'मिड डे'च्या वृत्ताचा हवाला देत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे, ज्याची छाननी करण्याची कोणालाही परवानगी नाही. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही ढोंग बनते आणि फसवणुकीला बळी पडते,' असे त्यांनी 'एक्स'वर लिहिले आहे.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ही घटना उच्च पातळीवरील फसवणूक असल्याचे सांगत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ही उच्च पातळीवरील फसवणूक आहे आणि तरीही @ECISVEEP झोपत आहे. जर निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला नाही तर हा चंदीगड महापौर निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा निवडणूक निकाल घोटाळा असेल आणि ही लढाई न्यायालयात पहायला मिळेल. या निर्लज्जपणाची शिक्षा झालीच पाहिजे,' असे ट्विट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, 'आश्चर्याची बाब म्हणजे निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. मला वाटते की हा आणखी एक चंदीगड क्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे."

दरम्यान, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाद निर्माण केला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन बंद करायला हव्यात. मानव किंवा एआयकडून हॅक होण्याचा धोका कमी असला तरी अजूनही खूप जास्त आहे," असे त्याने एक्सवर पोस्ट केले आहे.

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मात्र मस्क यांच्या ट्विटला उत्तर देताना डिजिटल हार्डवेअर सुरक्षित ठेवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मस्क यांना सुरक्षित इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे कशी डिझाइन करावी आणि कशी तयार करावी याबद्दल एक ट्यूटोरियल देखील ऑफर केले.

 

WhatsApp channel