मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune EVM Theft : पुण्यात खळबळ! सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिन लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune EVM Theft : पुण्यात खळबळ! सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिन लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 06, 2024 01:10 PM IST

EVM Machine Stolen From Saswad In Pune : लोकसभा निवडणुक तोंडावर असतांना पुण्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. सासवड येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरण्यात आली आहे.

EVM Machine Stolen From Saswad In Pune
EVM Machine Stolen From Saswad In Pune

EVM Machine Stolen From Saswad In Pune : निवडणुका तोंडावर आल्या असताना नुकतीच एक धक्कादाक घटना समोर आली आहे. तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरून नेले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकसभा निवडणुक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. असे असतांना पुण्यात सासवड तहसील कार्यालयाच्या गोदामातून ईव्हीएममशीन चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. आरोपी तहसील कार्यालयातून मशीनची चोरी करतांना दिसत आहेत. तब्बल तीन आरोपींनी या मशीन लंपास केल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीचा फोटो समोर; संजय राऊत म्हणाले…

याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे ग्रामीण पोलिस आधीक्षकांनी आरोपींना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात रवाना केली आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, "सासवड पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. येथील तहसील कार्यालयातील गोदामात थेनव्यात आलेल्या ४० ईव्हीएम मशिन्सपैकी एक डेमो युनिट चोरट्यांनी लंपास केले आहे. तर बाकीचे सुरक्षित आहेत. आम्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना करून त्यांना रवाना केले आहे. या प्रकरणाचा आम्ही कसून तपास करत आहोत.

ईव्हीएमच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर

देशात ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ईव्हीएम योग्य नसल्याचा आरोप देखील विरोधक करत असतात. हे मशीन हॅक करून यंत्रणेत बिघाड करून अनेकांना चुकीच्या पद्धतीने निवडून आणले जात असल्याचा देखील आरोप केला जातो. दरम्यान, तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याने हे यंत्र कितपत सुरक्षित आहे, याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

WhatsApp channel