इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक केले गेले! शरद पवार यांच्या शिलेदाराचा गंभीर आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक केले गेले! शरद पवार यांच्या शिलेदाराचा गंभीर आरोप

इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक केले गेले! शरद पवार यांच्या शिलेदाराचा गंभीर आरोप

Nov 27, 2024 03:26 PM IST

Prashant Jagtap on EVM : महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची व महत्वाच्या पदाधीकाऱ्यांची आज पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत प्रश्नात जगताप यांनी ईव्हीएम इस्रायली तंत्रज्ञानाने हॅक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Prashant Jagtap on EVM : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व हडपसर मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम बाबत गंभीर आरोप केले आहे. त्यांनी ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरुन हॅक केले असल्याचा, गंभीर आरोप केला आहे. ऐवढेच नाही तर प्री प्लॅन करून आमचा पराभव करण्यात आल्याचं देखील जगताप यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह महत्वाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला असीम सरोदे, हडपसर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार प्रशांत जगताप, कॅन्टोन्मेंट विधानसभा अविनाश बागवे, शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार दत्ता बहिरट, शिरूर हवेली मतदार संघाचे उमेदवार अशोक पवार, खडकवासला विधानसभा मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके आदी उपस्थित होते. या बैठकीत हा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला आहे. ईव्हीएम हॅक करुन सेट करुन आमचा पराभव करण्यात आला आहे. या साठी प्री प्लॅन करण्यात आला होता. हे सर्व जाणीव पूर्वक घडवण्यात आले आहे. इस्रायली तंत्रज्ञाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आले आहे. या मशीनमध्ये पक्षचिन्ह व उमेदवारांचे चिन्ह  लोड करताना गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे कोणतं चिन्ह लोड केलं हे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे या मशीनवर आम्हाला संशय आहे. या मशीनला खास प्रोग्राम देण्यात आला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत हे मशीन काम करेल. या मशीनमध्ये टाइमिंग सेट केलाय. त्यामुळे ईव्हीएममधील घोळ समोर येणार नाही.

व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी आयोगाकडे पैसे भरणार

प्रशांत जगताप म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे. या निघाल्यामुळे देशातील लोकशाही संपते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  हा निकाल आम्हाला मान्य नाही. आम्ही व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरणार आहे. हे मशीन हॅक करण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरले आहे. हे मशीन हॅक झाले आहे हे येत्या आठवड्यात सिद्ध करणार असून महायुती सरकारने रडीचा डाव खेळाला आहे, असे देखील जगताप म्हणाले. 

Whats_app_banner