Kajwa Mahotsav Bhandardara : भंडारदऱ्यातील काजवा महोत्सव बंद होणार?, पर्यावरणप्रेमींची वनविभागाकडे मागणी
kajwa mahotsav bhandardara kalsubai : पावसाळ्यापूर्वी भंडारदरा परिसरात होणाऱ्या काजवा महोत्सवावर तातडीने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
kajwa mahotsav in bhandardara dam and kalsubai : गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या भंडारदरा धरण आणि कळसूबाई शिखर परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे परिसरात लुकलुक करतात. त्यामुळं महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक भंडारदरा परिसरात येत असतात. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्यामुळं वनविभागने यंदाच्या काजवा महोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु आता पर्यावरणवाद्यांनी भंडारदऱ्यातील काजवा महोत्सव बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता यंदाचा काजवा महोत्सव वादात सापडण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भंडारदरा, हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई शिखर परिसरात मे आणि जून महिन्यात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने भंडारदरा परिसरात गर्दी करत असते. यावेळी अनेक तरुण-तरुणी मद्यप्राशन करत हुल्लडबाजी करत असल्याचा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी काजवा महोत्सव बंद करण्याची मागणी केली आहे. टवाळखोर तरुणाईच्या हुल्लडबाजीमुळे वन्यजीवांना त्रास होत असून पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं पर्यावरणवाद्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी वनविभागाला एक पत्र लिहून काजवा महोत्सव बंद करण्याची मागणी केली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण आणि कळसूबाई शिखर पाहण्यासाठी दरवर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महिन्यात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत असतात. याचवेळी भंडारदरा परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. परंतु अनेकजण काजवा महोत्सव सुरू असताना मद्यप्राशन करत हुल्लडबाजी करत असल्याचे प्रकार समोर आलेले आहे. त्यामुळं आता यंदाचा काजवा महोत्सव बंद होणार की वनविभागाकडून काही उपाययोजना करण्यात येणार, याकडे पर्यटकांचं लक्ष लागलेलं आहे.