शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यानं कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यानं कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना

शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यानं कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना

Nov 27, 2024 08:29 AM IST

Panvel Crime news : पनवेलमध्ये एका इंजिनियर तरुणाने कॉलेजची फी भरण्यासाठी चक्क चोरी केली. या तरुणाने मोबाइल शॉप लुटले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यांन कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना
शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यांन कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना

Panvel Crime news : शिक्षणामुळे स्वत:च्या पायावर उभं राहता येतं. मात्र, हेच शिक्षण घेण्यासाठी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पनवेलमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली असून शिक्षण घेण्यासाठी एका तरुणाने चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडला. फी भरण्यासाठी त्याने मोबाइल दुकानात चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यावर ही बाब उघड झाली आहे.

शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. मुलांना मोफत देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. मात्र, अनेक संस्था शिक्षणाच्या नावाखाली लूटमार करतात. आपले शिक्षण पूर्ण करून जबाबदार नागरिक होण्यासाठी मुंबईमध्ये तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. या २० वर्षीय गरजू तरुणाने पनवेलमध्ये असलेल्या एका मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून २४ लाख रुपयांचे ५५ महागडे मोबाईल लंपास केले. या प्रकरणी दुकानदार मालकाने पोलिसांत तक्रार दिली होती.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी या फुटेजवरून तरुणाचा माग काढला. यात आरोपी हा मुंबईच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याला चोरी का केली ? असे विचारले असता त्याने कॉलेजची फी भरण्यासाठी चोरी केल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे नेले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.a Aq

मुंबई व परिसरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या घटनांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. खून, चोऱ्या, लूटमार, दरोडे मारामारी या घटना वाढल्या आहे. किरकोळ कारणावरून या घटना घडत आहेत. त्यामुळे या वाढत्या घटनांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर