मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वेचे इंजिन रुळांवरून घसरले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वेचे इंजिन रुळांवरून घसरले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 11:00 PM IST

central railway : मध्य रेल्वे मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळावरून खाली घसरल्याने कसारा व मुंबई-ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

इंजित रुळावरून घसरले
इंजित रुळावरून घसरले

मध्य रेल्वे मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान आज (मंगळवार) रात्रीच्या सुमारास इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली. या घटनेमुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक त्याचबरोबर कसाऱ्याहून कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल सेवेवर परिणाम झाल्याने ठाणे, कल्याण आणि मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. 

कसारा- इगतपुरी मार्गावरून घाटातून लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यासाठी दोन इंजिन वापरले जाते. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हे इंजिन कसाऱ्याहून इगतपुरीच्या दिशेने जात होते. इंजिन कसाऱ्याजवळील रेल्वे उड्डाणपूलाजवळ आले असता इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली.

घटनेनंतर मध्ये रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इंजिन रुळांवर आणण्यासाठी प्रशासनाने ओव्हरहेड तारेमधील विद्युत प्रवाह बंद केला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. कसारा-आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान हावडा दुरांतो आणि पंचवटी या लांब पल्ल्यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाकडून इंजिन रुळांवर आणण्याचे काम सुरू होते.

IPL_Entry_Point

विभाग