ED Raid In Mumbai : स्वत: भागीदार असलेल्या बांधकाम कंपनीतील अन्य भागीदारांची तब्बल ११३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दादरमधील दादासाहेब फाळके मार्गावरील साड्यांसाठीच्या ‘भरतक्षेत्र’ या सुप्रसिद्ध दुकानाशी संबंधित पाच ठिकाणांवर ईडीने कारवाई करत छापे टाकले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
२०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात ११३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या नुसार अरविंदलाल शहा यांच्या एसबी डेव्हलपर्स बांधकाम कंपनीकडे परळ भागातील अब्दुल्ला १, २ व ३ या तीन इमारतींच्या पुनर्विकासाचे काम २००६ मध्ये मिळाले होते. मात्र, या जागेवर एका शाळेची लीज असल्याने ती काढण्यासाठी शहा यांनी ६७ लाख रुपये पालिकेला दिले. दरम्यान, या मुले आर्थिक विवंचनेत सापडलेले शहा हे ‘भरतक्षेत्र’ दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे आर्थिक निधी उभारणीची मदत मागीतली.
दरम्यान यांनी कंपनीत ५० टक्के हिस्सेदारीच्या बोलीवर मदत करण्यास होणार दिला. शहा यांनी देखील याला मंजूरी दिली. दरम्यान, यानंतर आणखी व्यवसाय करण्यासाठी एसबी अबोड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दोघांनी स्थापन केली. यात शहा यांनी गाला यांना ५०-५० टक्के भागीदारी देण्यात आली. यानंतर या कंपनीचे अध्यक्ष गाला यांना करण्यात आले. दरम्यान, गाला यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अरविंदलाल शहा यांनी आर्थिक गुन्हे विभागात केली होती. या प्रकरणी ११३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानीसार ईडीने शहा यांचा जबाब नोंदवत गाला यांच्याशी संबंधीत अस्थापणावर धाडी टाकल्या.
‘मनसुख गाला व त्यांचे सीए दिनेश शहा या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून व आपली बनावट डिजिटल स्वाक्षरी करून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दस्तावेज दाखल केले. तसेच कंपनीतील शहा यांची ५० टक्के हिस्सेदारी कमी करून ती २५ टक्क्यांवर आणली. तसेच ११३ कोटी रुपयांची फसवणु करण्यात आल्याचे आरोप करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या