
ED Raids Bharatkshetra shop : विवाहासाठी कपडे खरेदीसाठी मुंबईतील आकर्षणाचं केंद्र असलेल्या दादरमधील भरतक्षेत्र या शोरूमवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं. सकाळी साडेदहाच्या सुमारास आलेले ईडीचे अधिकारी दुकानात झाडाझडती घेत असल्याची माहिती आहे.
भरतक्षेत्र हे प्रामुख्यानं महागड्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लग्नसमारंभ आणि मोठमोठ्या सोहळ्यांसाठी लागणाऱ्या आकर्षक व महागड्या साड्या इथं विकल्या जातात. लगीनसराईच्या दिवसात या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.
सध्या लगीनसराईचा मोसम सुरू असतानाच भरतक्षेत्रवर छापा पडला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून भरतक्षेत्रच्या चालकांची चौकशी सुरू होती. आज शोरूममध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. काही महत्त्वाची कागदपत्रंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं समजतं.
संबंधित बातम्या
