युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव याच्याविरोधात रेव्ह पार्टीला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्या आयोजित करून त्यांमध्ये ड्रग्स ची विक्री करण्याचा आरोप लावला आहे. यासोबतच नशा करण्यासाठी काही सापांचे विष देखील तो या पार्टीत पुरवत होता असा आरोप आहे. त्याला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करून तिथे येणाऱ्या लोकांना सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा आरोप एल्विशव रकरण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याच्यासह इतर पाच जणांना अटक झाली आहे.
दरम्यान, एल्विश यादव विरोधात गुन्हे दाखल होऊन त्याला अटक होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्याचे कारण आहे, एल्विशचे त्यांच्या घरी जाणे.यंदाच्या गणेशोत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा बंगल्यावर बोलावले होते. त्याच्या हस्ते गणपतीची आरतीदेखील केली होती. आता मुख्यमंत्र्यांबरोबर एल्विशचे फोटो शेअर करत विरोधक एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाकरत असून महराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटमध्ये एल्विशचा सहभाग आहे का, याच्या चौकशीची मागणी करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे,नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातील तरुणांनचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का?” असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सवातला फोटो एक्सवर शेअर करत सवाल केला आहे, की विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्ज रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्जशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की,एल्विष यादव काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीची आरती करण्यासाठी आला होता. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत आहेत. या सगळ्या घटना नेमका एल्विष यादव मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन गेल्यानंतर उघडकीस का आल्या हा प्रश्न निर्माण होतो. मुळात याला मुख्यमंत्र्यांनी आरतीचा मान का दिला? महाराष्ट्राच्या ड्रग्स रॅकेट मध्ये या एल्विश यादव चा सुद्धा हात आहे का,याची पूर्ण तपासणी व्हायला हवी.