मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महावितरणचा ग्राहकांना शॉक ! वीज बिलात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

महावितरणचा ग्राहकांना शॉक ! वीज बिलात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 01, 2024 11:37 PM IST

Electricity Bill Hike : विजेचे दर वाढणारअसूनएक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी वीज ग्राहकांच्या बिलातजवळपास साडे सात टक्क्यांची वाढ होणार आहे.

वीज बिलात वाढ होण्याची शक्यता
वीज बिलात वाढ होण्याची शक्यता

देशात महागाईचा दर वाढला असताना आता महावितरणही ग्राहकांना शॉक देण्याच्या तयारीत आहे.  महाराष्ट्रात विजेचे दर वाढणार असून एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी वीज ग्राहकांच्या बिलात जवळपास साडे सात टक्क्यांची वाढ होणार आहे. 

महावितरणकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात वीज दरात १० टक्क्यांची वाढ केली जाण्याची माहिती मिळत आहे. एका वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने गेल्यावर्षी वीज दरवाढीला मान्यता दिली होती. यानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. 

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसा शुन्य ते १०० युनिटपर्यंत वीज दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही.  १०१ ते ३००  युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना वीज दर १०.८१ रुपयांवरून ११.४६ रुपये प्रति युनिट आकारला जाणार आहे. तर ३०१ ते १००० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना १७.८१ रुपये दर आकारला जाणार आहे. आधी हा दर १६.७४ रुपये होता.

महावितरणच्या या दरवाढीचा परिणाम घरगुती वीज ग्राहकांपासून, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक कंपन्यांनाही बसणार आहे. गेल्यावर्षी वीज बिलात सव्वा सात टक्क्यांची सरासरी वाढ झाली होती. आता पुन्हा या आर्थिक वर्षात साडे सात टक्क्यांची सरासरी बिलात वाढ होणार आहे. 

IPL_Entry_Point

विभाग