मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 29, 2022 07:56 PM IST

Legislative Council Elections Announced : विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर
विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुंबई - विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  नाशिक,  अमरावती,  नागपूर,  औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाला आहे. त्यापैकी २ जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचा यात समावेश आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात राज्यातील २ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. 

निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे -

निवडणुकीची अधिसूचना - ५ जानेवारी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - १२ जानेवारीपर्यंत 

अर्ज माघारी घेण्याची मुदत - १६ जानेवारीपर्यंत 

मतदान - ३० जानेवारी

मतमोजणी - २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच भाजपने जाहीर केली आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अनेक इच्छुक उमेदवार असतानाही सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी भाजपतर्फे निश्चित मानली जात आहे.

IPL_Entry_Point