rajya sabha election : राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  rajya sabha election : राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त

rajya sabha election : राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त

Updated Aug 07, 2024 03:09 PM IST

rajya sabha election : राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील २ जागा राज्यातील आहेत.

राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त
राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त (HT_PRINT)

rajya sabha election : लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आता राज्यसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे. तब्बल १२ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील दोन जागा या राज्यातील आहेत. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख देखील जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार हे लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुंबईतील पियुष गोयल हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्याने या दोन जागांवर देखील निवडणूक होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या १२ जगासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १४ ते २१ |ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर २६ ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर ३ सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

महाविकास आघाडी व महायुतीत होणार लढत ?

राज्यातील रिक्त जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर कुणाला संधि मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा झाला होता विजय

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभेत पुरेशी ताकद नसल्याने महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार निवडणुकीत उभा केला नव्हता. यामुळे सुनेत्रा पवार यांची राज्यसभा संदस्यपदी बिनविरोध निवड झाली होती.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर