Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी मतदान आणि मतमोजणी

Jun 18, 2024 03:49 PM IST

Maharashtra legislative council election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार असून मतदान संपताच सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक  कार्यक्रम जाहीर
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक  कार्यक्रम जाहीर

Maharashtra legislative council constituency election : निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या रिक्त ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी  १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (legislative council Election) रिक्त ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार असून मतदान संपताच सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. २ जुलैपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून ३ जुलै रोजी अर्जांची छानणी आणि अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या धूमधाम संपताच महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या  १४ जागा रिक्त असून त्यापैकी ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याचे वेळापत्रक जारी केलं आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या या ११ जागांपैकी ५ जागांसाठी भाजप, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी २ जागांसाठी महायुती प्रयत्नशील असेल. तर उर्वरित दोन जागा मविआ एकत्र लढू शकते. यात काँग्रेसला एक तर महाविकास आघाडी एकत्रित एक जागा लढण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे  महायुती आणि मविआकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. 

कार्यकाळ संपणार असलेले आमदार -

विधानपरिषदेतील ११ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, महादेव जानकर, अनिल परब, मनीषा कायंदे, डॉक्टर वजाहर मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव, बाबाजानी दुराणी, जयंत पाटील यांचा समावेश आहे.

निलय नाईक, रामराव पाटील, रमेश पाटील, विजय गिरकर हे भाजपाचे सदस्य आहेत. तर मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गट, अनिल परब शिवसेना ठाकरे गट, बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेस, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव हे काँग्रेसचे आणि जयंत पाटील शेकाप, महादेव जानकर रासप हे ११ सदस्य १० जुलै २०१८ रोजी बिनविरोध निवडून आले होते. त्यांची मुदत २७ जुलैला संपत आहे. त्याचबरोबर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप रिक्त आहेत. मविआ सरकारच्या काळात १२ जणांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती परंतु त्याला राज्यपालांनी मंजुरी नव्हती. त्या जागा अद्याप रिक्त आहेत.

Whats_app_banner