NCP Sharad Pawar : विधानसभेला पिपाणीचा आवाज बंद, आता तुतारी जोरात वाजणार? शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Sharad Pawar : विधानसभेला पिपाणीचा आवाज बंद, आता तुतारी जोरात वाजणार? शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा

NCP Sharad Pawar : विधानसभेला पिपाणीचा आवाज बंद, आता तुतारी जोरात वाजणार? शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा

Jul 20, 2024 12:17 AM IST

electioncommission : विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगानं ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवरबंदी आणत ही दोन्ही चिन्ह गोठवली आहेत.

शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा
शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. आयोगानेअपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी आणि तुतारी ही दोन चिन्ह गोठवली आहेत. चिन्हातील साधर्म्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराला फटका बसल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. दिंडोरीत शरद पवार गटाचा उमेदवार विजयी झाला. मात्र अपक्ष उमेदवाराच्या पिपाणी चिन्हालाही लाखाहून अधिकमतं मिळाल्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगानं नवे परिपत्रक काढत ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवर बंदी आणत ही दोन्ही चिन्ह गोठवल्याचं जाहीर केलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत १० पैकी ८जागा जिंकल्या. पण, या निवडणुकीत पवार गटाला महायुतीपेक्षाही अपक्ष उमेदवारांचाच अधिक फटका बसल्याचे दिसून आलं. याचं कारण तुतारीशी साम्य असणारी दोन चिन्हं होती. ती म्हणजेट्रम्पेट आणि पिपाणी अर्थात तुतारी. मात्र या दोन्ही चिन्हावर आयोगाने बंदी घातली आहे.

दिंडोरीत भास्कर भगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारहोते. त्यांच्याविरोधात बाबू भगरे निवडणूक लढवत होते.नावातील साम्य असल्यामुळे बाबू भगरेंनाही १ लाख ३ हजार मतं मिळाली. बाबू भगरेंचं निवडणूक चिन्ह पिपाणी होतं. पिपाणी आणि तुतारीमध्ये साम्य असल्यानं मतदारांचा गोंधळ उडाळ्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता.

महाराष्ट्र राज्यातील राज्य पक्षांच्या यादीत आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचा समावेश करण्यात आला असून या पक्षाला तुतारी वाजवणार माणूस चिन्ह देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी फटका बसला होता. साताऱ्यात तर पिपाणीमुळे शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदेंना ५ लाख ३८हजार ३६३ मते मिळाली तर भाजपच्या उदयनराजेंना ५ लाख  ७१ हजार १३४ मते मिळाली. उदयनराजेंनी ३२ हजार ७७१ च्या मताधिक्यानं शिंदेंचा पराभव केला. पण, याच मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडेंनी तब्बल ३७ हजार ६२ मते घेतली.  म्हणजेच जर पिपाणी चिन्ह नसते तर ही मते शशिकांत शिंदेंना मिळाली असती आणि त्यांचा जवळपास ५ हजार मतांनी ते विजय झाला असता, असा दावा शरद पवार गटाने केला आहे.

सातारा दिंडोरीसोबतच बीड,अहमदनगर दक्षिण आणि बारामतीतही पिपाणीमुळे तुतारीचा आवाज क्षीण झाल्याचे पाहायला मिळालं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या