Mumbai Robbery: मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरला; शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Robbery: मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरला; शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटले

Mumbai Robbery: मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरला; शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटले

Published Jan 31, 2023 05:44 PM IST

Dadar Robbery: मुंबईच्या दादर परिसरातून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी माहिती समोर आली असून मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरुन एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेची १२ लाखांची लुट करण्यात आल्याची घटना घडली.

Dadar Robbery
Dadar Robbery (HT_PRINT)

Elderly woman robbed at her home in Dadar Mumbai: मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरला आणि शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याची घटना मुंबईच्या दादर परिसरात सोमवारी (३० जानेवारी २०२३) घडली. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरोडेखोराने वृद्ध महिलेच्या घरातून एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याचे वृद्ध महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

फिर्यादी महिला कीर्ती महाविद्यालयाजवळील एका रहिवासी इमारतीत राहतात. सोमवारी दुपारी वृद्ध महिला घरात एकट्याच असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला. वृद्ध महिलेने दार उघडतातच आरोपीने तिचा गळा आवळून त्याने पिस्तुलसारखे शस्त्र त्यांच्यावर रोखले. त्यानंतर आरोपीने घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून पलायन केले, अशी तक्रार दादर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरातून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गळ्यातील हार असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे वृद्ध महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जबरी चोरी व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ४० ते ४५ वयोगटातील असून त्याने निळ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली होती, अशी माहिती वृद्ध महिलेने पोलिसांनी दिली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर