Mumbai Woman Murder : मुंबईतील वांद्रे परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेला बांधून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या महिलेची हत्या केल्याचे उघड झालं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली आहे.
रेखा खोंडे असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. तर शहरीफ अली समशेर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला रिक्लेमेशन डेपो कांचन बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं कळलं. वांद्रे पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपीने रेखा खोंडे यांचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचे आढळले. पोलिसांनी रेखा खोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या २ तासांत आरोपीचा शोध लावत त्याला अटक केली आहे. अली समशेर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव असून तो या महिलेच्या घराशेजारी राहतो. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक माहितीच्या आधा शहरीफ अली समशेर शेख हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने तीन दिवसापूर्वी चोरीच्या उद्देशाने रेखा खोडे य यांच्या घरात जाऊन त्यांचे हात पाय बांधून त्यांचा चाकूने गळा चिरला.
यानंतर त्याने घरातील काही किमती वस्तूंची चोरी करून घराचा दरवाजा बंद केला व फरार झाला होता. घरातून दिवसानंतर आज बंद घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी समोरचं दृश्य पाहून पोलिसही हादरले. पोलिसांनी घराची तपासणी करून केवळ दोन तासात आरोपीला अटक केली व चोरी गेलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
संबंधित बातम्या