मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : आमदार पळाले की पाठवले? काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका
सोनिया गांधी आणि शरद पवार
सोनिया गांधी आणि शरद पवार (हिंदुस्तान टाइम्स)

Eknath Shinde : आमदार पळाले की पाठवले? काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका

23 June 2022, 13:14 ISTDilip Ramchandra Vaze

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या विरोधात आमदारांमध्ये इतका असंतोष कसा? शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) गुवाहाटीला (Guwahati) पाठवण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी तर करत नाहीये ना? हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना (Congress And NCP) धोका दिला जात नाहीये ना? अशी शंका आता या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Political Crisis : एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा रोवला असताना दुसरीकडे आता मात्र इतकी मोठी घडामोड शिवसेनेच्या (Shiv Sena)लक्षात कशी आली नाही असा प्रश्न आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या (Congress and NCP) नेत्यांना पडला आहे. अगदी जे आमदार (Shiv Sena MLA) शिवसेनेच्या सोबत असल्याचा दावा करत होते. तेच आमदार हॉटेलमधून पळ काढत थेट गुवाहाटी (Guwahati) गाठत असल्यानं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समर्थनाने शिवसेना राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन गेली अडीच वर्ष कारभार करत होती. अचानक राज्यसभा निवडणुकीत संजय पवार यांना जिंकवण्यात शिवसेनेला आलेलं अपयश आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही पाहावं लागलेल्या पराभवाच्या तोंडानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणाला वेग आला आणि एनात शिंदे अचानक नॉट रिचेबल झाल्यानंतर राज्यात उडालेला राजकीय धुरळा गेले दोन दिवस पाहायला मिळाल्यानंतर आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्यात शंकेची पाल चुकचुकत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात आमदारांमध्ये इतका असंतोष कसा ? शिवसेना आमदार गुवाहाटीला पाठवण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी तर करत नाहीये ना? हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना धोका दिला जात नाहीये ना? अशी शंका आता या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडल्यानेही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे मातोश्रीवर आल्यावर पहिल्यांदाच शरद पवार यांच्याउपस्थित राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच आम्ही हे पाऊल उचलल्याचं सांगितले आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत अल्पमतात आलेल्या सरकारला कसं वाचवलं जाऊ शकतं? राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडायचं का? यावर ही महत्वपूर्ण बैठक पार पाडणार आहे.

शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री यांनी काल आपल्या भाषणात स्पष्ट केले असले तरी आता सरकार अल्पमतात आल्याचे चित्र निर्माण झाल्याने या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.