Eknath Shinde MLA Fight : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये मोठा राडा झाला आहे. आमदार दादा भुसे (Dadaji Bhuse) आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)यांच्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या वादाची कुणकुण भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांना लागलत्याने त्यांनी तातडीने मध्यस्थी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. हा वाद नेमका कशामुळे झाला ही समजू शकले नाही. दरम्यान, थोरवे यांनी मतदार संघातील कामावरून भुसे यांना जाब विचारल्याने ही वादावादी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
विधान सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (maharashtra assembly session) सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या साठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आम विधीमंडळात (Maharashtra Politics) आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आले होते. ते सभागृहात असतांना महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे हे लॉबीमध्ये होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या मतदार संघातील कामाची विचारणा दादा भुसे यांना केली. या कारणामुळे दादा भुसे यांना राग आला. यावरून दोघांमध्ये आधी वाद झाला. हा वाद नंतर बाचाबाचीत झाला. यातून दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दोघांचे वाढलेले आवज ऐकून त्या ठिकाणी असलेले शंभुराजे देसाई व भरत गोगावले (bharat gogawale)हे त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. दरम्यान, या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. सुसंस्कृत आमदारांमध्ये या प्रकारचे वाद होणे योग्य नाही अशी टीका विरोधकांनी केली.
एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असतांना (Eknath Shinde MLA Fight) आमदार एकमेकांसोबत भांडणे करत असतील तर विधानसभेमध्ये सुद्धा पोलीस लावण्याची वेळ आली अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा वाद कळल्यावर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे दोघांना त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले.
दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबुक्कीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणीयचे टाळले. या वादाबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, काहीतरी काय विचारता. अधिवेशनाचा विषय आहे, त्यावर विचारा. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी असा वाद झालाच नाही असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या