मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : सामनाचं कार्यालय ते शिवसेना भवन मुंबईत शिवसेनेची बाईक रॅली
शिवसैनिकांची बाईक रॅली
शिवसैनिकांची बाईक रॅली (हिंदुस्तान टाइम्स)
26 June 2022, 12:18 ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 12:18 IST

शिवसेनेचाचा भगवा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवत शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबाद च्या घोषणा देत दादर आणि आसपासचा परिसर दुमदुमून टाकला.

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडाचा झेंडा हाती घेतला असल्यानं आता आपल्या शिवसैनिकाला (Shiv Sena) एकत्र करण्यासाठी शिवसेनेही पुढे सरसावल्याचं चित्र आहे. राज्याच्या राजकारणात  (Maharashtra) आता शिवसैनिकांची वज्रमूठ अभेद्य ठेवण्यासाठी आता शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leaders) आणि कार्यकर्तेही पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सामना ऑफिस ते शिवसेना भवन (Saamna Office To Shiv Sena Bhavan) अशी बाईक रॅली (Bike Rally) काढली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई सोबतच पुणे,नाशिक इथंही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेतर्फे आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता थेट आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते अलर्ट आणि अॅक्शन मोडवर आले आहेत.शिवसेनेचाचा भगवा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवत शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबाद च्या घोषणा देत दादर आणि आसपासचा परिसर दुमदुमुन टाकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत आलेलं नैराश्य गेल्या दोन तीन दिवसांपासून झटकण्याच्या विचारात शिवसेनेचे नेते असलेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनं त्यासाठी आजची बाईक रॅली काढली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता राज्यातही शिवसैनिक मोठ्या संख्येने उतरताना पाहायला मिळत आहेत. 

एरवी शांत असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनीही अचानक विरोधकांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यातं पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना (Shivsena) अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येतंय. आज मुंबईत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा शिवसेना (Shivsena) मेळावा आहे. या मेळाव्यात संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे. आदित्य ठाकरे ११ वाजता कलिना- कुर्ला भागातल्या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. तर संजय राऊत यांचा दहीसर भागात ११ वाजता मेळावा होणार झाला.  

त्याआधी आज सकाळी संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे बंडखोर शिवसैनिकांना डिवचलं होतं. कब तक छीपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे..असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. शिवसेना आपल्या जुन्या अरे ला कारे करण्याच्या मनस्थितीत पाहायला मिळत आहे. तिथेच आदित्य ठाकरेंनीही काल रात्री मुंबईतल्या लाला लजपतराय महाविदयालयात झालेल्या एका मेळाव्यात एअरपोर्ट हुन मंत्रालयात जाणारा रस्ता वरळीहून जातो असं म्हणत आक्रमकतेचा परिचय दिला होता.