आपलं सरकार येणार पण… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आपलं सरकार येणार पण… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले…

आपलं सरकार येणार पण… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले…

Nov 26, 2024 09:22 AM IST

Eknath Shinde Tweet : राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच वाढत चालला आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडं जाणार हे समजताच नाराज एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट केलं आहे.

आपलं सरकार स्थापन होणार पण....! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले..
आपलं सरकार स्थापन होणार पण....! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले..

Eknath Shinde Tweet : राज्यात विधानसभेचे निकाल लागून तीन दिवस झाले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी स्वत: एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार आग्रही आहेत. तर भाजपने देखील मुख्यमंत्री पदावर दावेदारी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतून होणार असून भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक महत्वाचं ट्विट केलं आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, नवनिर्वाचित आमदार, व कार्यकर्त्यांनी आज वर्षा बंगल्यावर जमण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना म्हटलं की, महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.

मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिल्याने त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

yoyoutube.com/watch?v=PQaeRnseiNc

भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. दिल्लीतून निरोप मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी रद्द केल्याचे समजत आहे. यामुळे एकनाथ शिंदे महायुतीसोबत राहणार की वेगळा विचार करतील, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

Whats_app_banner