मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठरलं! बंडखोर एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाणार. व्हिडिओ viral.
Eknath Shinde in Guwahati
Eknath Shinde in Guwahati

ठरलं! बंडखोर एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाणार. व्हिडिओ viral.

23 June 2022, 20:32 ISTHT Marathi Desk

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला शिवसेना आमदारांचा गट भाजपला समर्थन देणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मिटिंगमधला व्हिडिओ व्हायरल होतोय. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीत एकवटलेले आमदार भाजपती वाट धरणार असल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होतय. त्यामुळे नाराज शिवसेना आमदारांना मुंबईत परत आणण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नांना मोठा झटका लागणार असं दिसतय.

ट्रेंडिंग न्यूज

आसामची राजधानी गुवाहाटी शहरातील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये शिवसेनेच्या तीस पेक्षा अधिक नाराज आमदारांनी सध्या मुक्काम ठोकला आहे. या हॉटेलमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करत आहेत. या हॉटेलमध्ये एका मोठ्या हॉल मध्ये एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यातील संभाषण ऐकल्यावर एकनाथ शिंदे यांची यापुढची वाटचाल भाजपसोबत होणार असं दिसतय.

‘आपल्या सर्वांसमोर एक आव्हान आहे. जे काही सुख दुख आहे, ते आपल्या सर्वांचे एकच आहे. 'ती' नॅशनल पार्टी आहे… महाशक्ती आहे... त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला.' असं एकनाथ शिंदे बंडखोर गटाच्या आमदारांना सागत असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येते. एकनाथ शिंदे या बैठकीत पाकिस्तानवर हल्ला करणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचं कौतुक करताना दिसत आहे.

आमदारांशी बोलत असताना एकनाथ शिंदे हे आपलं एका मोठ्या नेत्याशी बोलणं झालं असल्याचा उल्लेख करतात. ‘माझं बोलणं झालं आहे. शिवसेना आमदारांनी हा जो निर्णय घेतला, तो ऐतिहासिक असल्याचं ‘ते’ बोलले. या निर्णयाला भाजप कधीही काहीही कमी पडू देणार नाही.' मात्र हा भाजपमधील कोणता नेता आहे, हे स्पष्ट होत नाही.

२४ तासाच्या आत मुंबईत परता आणि उद्धव ठाकरेंना भेटून बोला

दरम्यान, शिवसेना आमदारांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपलं मत मांडावं, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमदारांनी पुढील २४ तासात मुंबईत परतावं, असं आवाहन राउत यांनी केलं आहे. तुम्हाला महाविकास आघाडीसोबत युती नको असेल तर तसं मुख्यमंत्र्यांसमोर मांडा. यावर पक्ष विचार करू शकतो, असं संजय राऊत यांनी सांगितले.