शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार घेणार शपथ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार घेणार शपथ

शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार घेणार शपथ

Dec 05, 2024 10:22 AM IST

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहे. त्यांच्या सोबत शिवसेचे नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वा अजित पवार घेणार शपथ
शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वा अजित पवार घेणार शपथ (PTI)

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र, त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का या बाबत स्पष्टता नव्हती. देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली असून त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आली आहे. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ते मंत्रिमंडळात कोणते पद घेणार याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा बांगल्यावर रात्री भेट घेतली. या भेटीत शिंदे यांची मनधरणी करण्यास त्यांना यश आले आहे. त्यामुळे आज प्रमुक्याने तिघांचा शपथविधी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री पदाची मागणी 

एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे आजच्या शपथविधीत शिंदे हे शपथ घेणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. त्यांनी शिंदे यांच्या मागणीचा सकारात्मकदृष्टीने विचार केला जाईल. पण तुम्ही आझाद मैदानावर आज आमच्या सोबत शपथ घ्या, असे म्हणत त्यांची मनधरणी केली. आम्ही दोघांनीच आज शपथ घेतली तर ते योग्य दिसणार नाही. आपण गेले दोन वर्ष एकत्र काम केले आहे. तुमच्या मागण्यांवर वरिष्ठाकंडून विचार केला जात असून शपथ विधीत सहभागी व्हा अशी विनंती केली. शिंदे यांनी फडणवीस यांची मागणी मान्य केली असून आज ते आझाद मैदानावर शपथ घेतील.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शिंदे यांची भेट घेऊन फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. पक्षाच्या आमदारांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले जात आहे. दिवसभर आमदार मावळत्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत होते. त्यामुळे पक्ष आणि सरकार दोघांनाही फायदा होणार असल्याने आम्ही त्यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. आम्हाला आशा आहे की तो आमच्या विनंतीचा आदर करेल. शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी सर्व आमदार आणि खासदारांची इच्छा आहे.

शिंदे राज्याच्या गृहमंत्रिपदावर ठाम असल्याचेही वृत्त आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीत गृहमंत्रालयाबाबत मोठी चर्चा झाली. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गृहमंत्रालयाबाबत चर्चा झाली तर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या