मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मन वळवणाऱ्यांच मन वळलं, रविंद्र फाटकही शिंदे गटात सहभागी
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे (हिंदुस्तान टाइम्स)
23 June 2022, 18:38 ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 18:38 IST

आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या दोन अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आमदार रविंद्र फाटकही (Ravindra Phatak) एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला (Shiv Sena) आणखी एक धक्का बसला आहे.

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडाचा फटका आता शिवसेनेला (Shiv Sena) मोठ्या प्रमाणावर बसताना पाहायला मिळत आहे. सोमवारी संध्याकाळी हा जोरका झटका शिवसेनेला जोरसे च बसला होता. त्यानंतर शिवसेनेच्या हायकमांडने आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक (Milind Narvekar & Ravindra Phatak) यांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरत इथं पाठवलं होतं. नाराज एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० मिनिटं या दोघांना वाट पाहायला लावल्यावर एकनाथ शिंदे यांनी या दोघांशी चर्चा केली होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना रिकाम्या हाती परत यावं लागलं होतं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. 

ट्रेंडिंग न्यूज

आता उद्धव ठाकरे यांच्या या दोन अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आमदार रविंद्र फाटकही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. आमदार रविंद्र फाटक आता गुवाहाटीला रवाना झालेत अशी बातमी आहे. रविंद्र फाटक यांच्याखेरीज कृषीमंत्री दादा भूसे आणि माजी वन मंत्री संजय राठोड हे आमदारही मुंबईहून गुवाहाटीसाठी रवाना झाले आहेत आणि त्यांच्यासोबतच आमदार रविंद्र फाटकही असल्याची माहिती आता समोर येत आहे.

मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात असल्यानं या दोघांना एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी पाठवलं गेलं होतं. आता मात्र ज्यांना मनधरणी करायला पाठवलं त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचं चित्र पाहायला मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सर्वात विश्वासू व्यक्तींपैकी एक रविंद्र फाटक याचं मन वळवण्यात एकनाथ सिंदे यांना आलेलं यश एकनाथ शिंदे गटाचा आत्मविश्वास आणखीनच वाढवणारा आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे.