Eknath Shinde: मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं!-eknath shinde on maha vikas aghadi over bombay high court maharashtra bandh decision ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं!

Eknath Shinde: मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं!

Aug 23, 2024 09:51 PM IST

Eknath Shinde On Maha vikas Aghadi: महाराष्ट्र बंदविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डवचलं
एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डवचलं (HT_PRINT)

Maharashtra Bandh Updates: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मनाई करणारा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा विरोधकांसाठी चपराक असून सरकार या आदेशाची अंमलबजावणी करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हटले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी बंदची हाक दिली. परंतु, उच्च न्यायालयाने संपाच्या आवाहनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर देताना कोणत्याही व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला असे आवाहन करण्यास मनाई केली आणि राज्य सरकारला प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सांगितले.

उच्च न्यायालयाचा आदेश विरोधकांसाठी चपराक

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की, 'बदलापूरची घटना हा मानवतेवरील कलंक आहे. लाडकी बहिन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केल्याने मिळालेल्या आनंदावरही त्याचा परिणाम झाला. परंतु, विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत आणि या योजनेची बदनामी करत आहेत. उच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे विरोधकांच्या तोंडावर चपराक आहे, सरकार या आदेशाची अंमलबजावणी करेल.'

विरोधकांचे राजकारण सुरू

'बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कायद्याच्या कडक तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधक राजकारण करत आहेत, पण राज्यातील बहिणी- महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विरोधकांनी जनतेला गृहीत धरू नये, काही लोक मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी इतके उत्सुक आहेत की, ते असे राजकारण करीत आहेत. हे विकृत आहे', असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बंदची हाक देणाऱ्या विरोधकांवर टीका केली. 'हे राजकारणासाठी आहे. कोलकात्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तुम्ही ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली नाही. पण इथे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बंदची हाक देत आहात,' असा टोला ही फडणवीस यांनी लगावला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिवसेना यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला.