लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार; आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार; आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार; आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Nov 25, 2024 09:02 AM IST

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : विधानसभेमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

निर्विवाद सत्ता मिळताच एकनाथ शिंदेंचे लाडक्या बहिणीबाबत मोठी घोषणा, २१०० रुपये कधी मिळणार ? तारीख सांगितली
निर्विवाद सत्ता मिळताच एकनाथ शिंदेंचे लाडक्या बहिणीबाबत मोठी घोषणा, २१०० रुपये कधी मिळणार ? तारीख सांगितली (Chandrakant Paddhane)

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment : राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महत्वाची भूमिका बजावली आहे. या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. दरम्यान, निवडणुकी आधी या योजनेची रक्कम ही १५०० वरुण २१०० रुपये करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे.

जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मांडली होती. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. पाच हप्ते महिलांना मिळाले असून आता सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहे. निवडणुकीच्या प्रचारा जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रक्कमेत वाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यास या योजनेची रक्कम १५०० वरून दरमहा २,१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावरून एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

गटनेतेपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, “ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये केले जाणार आहे. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे. त्यामुळे या योजनेची रक्कम ही २१०० रुपये केली जाणार आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता 

महायुतीला मोठं यश मिळाल्यावर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे. दरम्यान, तिन्ही नेत्यांनी या बाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं घोषित केलं आहे. आज यावर निर्णय होणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर