मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : सरकार जाणार या भीतीनं मंत्रायलात फाईल क्लिअर करण्याची धावपळ
मंत्रालयात फाईल क्लिअर करण्यासाठी धावाधाव
मंत्रालयात फाईल क्लिअर करण्यासाठी धावाधाव (हिंदुस्तान टाइम्स)
23 June 2022, 8:28 AM ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 8:28 AM IST

सध्या मात्र सरकार पडणार या भीतीने सध्याचे अनेक मंत्री फाईल क्लिअर करण्यावर भर देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मविआची (MVA) गेली अडीच वर्ष एकसंध राहिलेली मोट अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानं तुटली. त्यानंतर मविआ सरकारच्या बोटीला गळती लागल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत असतानाच आता मात्र सरकार पडणार या भीतीने अनेक मंत्र्यांनी मंत्रालयातल्या (Mantralaya) आपापल्या दालनात काम किंवा फायली क्लिअर(Files Clear) करण्यासाठी धावपळ सुरु केली असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे सरकार राहाणार की जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (Congress And NCP) अनेक नेते मंत्रालयात आपापल्या विभागाच्या फायली क्लिअर करण्यावर भर देत असताना पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यानं मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची मात्र धाकधूक वाढली आहे. गेले दोन दिवस मंत्रालयातले कर्मचारीही अतिरिक्त तास काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एरवी धूळ खात असलेल्या फायलींंचा ढिगारा मंत्रालयातल्या दालनांमध्ये पाहायला मिळतो. सध्या मात्र सरकार पडणार या भीतीने सध्याचे अनेक मंत्री फायली क्लिअर करण्यावर भर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतरवेळी मंत्रालयात फाईलींवर सह्या होण्यासाठी कित्येक दिवस लागत असत मात्र सत्तांतराची शक्यता गडद असल्याच्या भीतीने आता मंत्रालयात मात्र फाईली उपसण्याच्या कामांना वेग आला आहे. यामुळे प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला पडलेल्या भल्यामोठ्या भगदाडामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री कार्यालयांतही धावपळ वाढली आहे. काही विभागांमध्ये कर्मचारी कित्येक तास जादा बसून फाईल्स क्लिअर करण्याचं काम करताना पाहायला मिळाले असल्याचंही समजतंय.

एकनाथ शिंदे यांना वाढतं बळ

डोंबिवली, ठाणे अशा शिवनसेनेच्या हक्काच्या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना बळ मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘मी एकनाथ शिंदे समर्थक’ किंवा ‘वाघ एकला राजा’ अशा आशयाचे बॅनर्स ठाणे आणि डोंबिवलीच्या महामार्गांवर झकताना पाहायला मिळत आहेत.

बुधवारी सकाळपासून ठाणे शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी शिंदे समर्थकांनी हे बॅनर्स झळकवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मिडियावरही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं जाहीर समर्थन पाहायला मिळू लागलं आहे. बॅनर्सबद्दल बोलायचं झालं तर त्या बॅनर्सवर एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असल्याचं पाहायला मिळत आहे.