मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मराठा क्रांती मोर्चाचा आता शिवसेनेला थेट इशारा, म्हणाले…
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (हिंदुस्तान टाइम्स)
26 June 2022, 12:57 ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 12:57 IST

जर मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असेल तर मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) ते खपवून घेणार नाही. अशा कार्यकर्त्यांच्या हातातले झेंडे काढून त्यांच्या हातात दांडे दिले जातील असं आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांचं म्हणणं आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातला वाद आता संघर्षाच्या टप्प्यावर येऊन पोहोचल्याची चिन्हं असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) वादात उडी घेतलीय. बंडखोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर होणारी दगडफेक पाहाता आता मराठा क्रांती मोर्चाने शिवसैनिकांना इशारा दिला आहे. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या नेत्यांना जर टार्गेट केलं जात असेल तर झेंडा काढून दांडा हातात दिला जाईल असा सज्जड इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने हा इशारा शिवसैनिकांना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठा क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलंय पाहूया.

आबासाहेब पाटील यांच्या मते राज्यात सध्या एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्या वाद सुरु आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे किंवा तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक निंदनीय़ आहे. मराठा क्रांती मोर्चा त्याचा विरोध करत आहे. मात्र ज्या पद्धतीने ही दगडफेक केली जात आहे ते पाहाता ही दगडफेक मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय अशी शंका येत आहे. जर मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असेल तर मराठा क्रांती मोर्चा ते खपवून घेणार नाही. अशा कार्यकर्त्यांच्या हातातले झेंडे काढून त्यांच्या हातात दांडे दिले जातील असं आबासाहेब पाटील यांचं म्हणणं आहे.

तिथेच आज दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा सलग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला. आजही राज्यात मुंबई, पुणे, नाशिक अशा भागात शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन केलंय. शिवसेनेचे सध्याच्या फळीतले नेतेही आता आपापल्या प्रभागात जाऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेही कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. संजय राऊतही शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे तर बिग बॉसचं घर वाटतंय असं म्हणालेत. या शिवसेनेला एकच बाप आहे असंही संजय राऊत म्हणालेत.