मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaidev Thackeray: 'एकनाथ शिंदे हे राबकरी; नव्यानं निवडणूक घेऊन खऱ्या अर्थाने शिंदे राज्य येऊ द्या'

Jaidev Thackeray: 'एकनाथ शिंदे हे राबकरी; नव्यानं निवडणूक घेऊन खऱ्या अर्थाने शिंदे राज्य येऊ द्या'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 05, 2022 09:03 PM IST

Jaidev Thackeray: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. बीकेसी मैदानावर मंचावर उपस्थित राहून त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडू नका असे आवाहन केलए आहे.

Jaydev Thackeray
Jaydev Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या शिंदे गटाच्या दासऱ्या मेळाव्यात जयदेव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसलेले दिसले. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडू नका असे आवाहन केले. हे जे सरकार आहे ते बरखास्त करून पुन्हा नव्याने निवडणूका घेऊन शिंदे राज्य येऊ द्या असे देखील जयदेव ठाकरे म्हणाले.

जयदेव ठाकरे यांच्या बरोबर स्मिता ठाकरे या देखील बीकेसीमैदानावर उपस्थित आहेत. यामुळे आता ठाकरे कुटुंबातीलच सदस्यानं अशाप्रकारे शिंदेंना उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही स्मिता ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचं स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या. पण आज थेट राजकीय व्यासपीठावर जयदेव ठाकरे आणि स्मित ठाकरे आल्यामुळे शिंदेंनी मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.

जयदेव ठाकरे म्हणाले, आम्हा ठाकरे यांचे काही ठरलेले नसते. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही काळात ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या खूप आवडल्या. असा माणूस महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी येथे आलो आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि हा एकनाथ याला जवळच्यांनी संपवले. या एकनाथाला एकतेपडू देऊ नका. हे शेतकऱ्यांचे नेते आहे. एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे नेते आहे. ते खऱ्या अर्थाने राबकरी आहे. त्याला पाठिंबा द्या. त्याची साथ सोडू नका. माझे मत आहे की जे जे आता सुरू आहे ते बस करा आणि पुन्हा नव्याने निवडणूक घेऊंन एकनाथ शिंदे यांचे राज्य येऊ द्या, असे आवाहन जयदेव ठाकरे यांनी बीकेसी मैदानातून केले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग