मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : ..तर १०५ जरी असले तरी विरोधातच बसावं लागलं असतं, शिंदे गटानं फडणवीसांना सुनावलं

Maharashtra Politics : ..तर १०५ जरी असले तरी विरोधातच बसावं लागलं असतं, शिंदे गटानं फडणवीसांना सुनावलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2024 04:29 PM IST

Devendra Fadanvis Vs Shinde Group : एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्ता मिळाली हे विसरू नये, अन्यथा १०५ असूनही विरोधातच बसावे लागले असते, असा टोला एकनाथ शिंदे गटाने फडणवीसांना लगावला आहे.

शिंदे गटाचा देवेेंद्र फडणवीसांना टोला
शिंदे गटाचा देवेेंद्र फडणवीसांना टोला

BJP Vs Shinde Group : एकनाथ शिंदेंच्या गटातील नेते रामदास कदमयांनी भाजपला खडेबोल सुनावत आपल्या मुलाला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख करत केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना समज देण्याची मागणी केली आहे. भाजपाने आमचा केसाने गळा कापू नये, असंही रामदास कदम म्हणाले. रामदास कदमांच्या युतीमुळे शिंदे गट आणि भाजपमधील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी फडणवीसांनांला सुनावले आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला आठवण करून दिली आहे की, भाजपचे १०५ आमदार असूनही ४० आमदार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा समान्मानच केला आहे. त्यामुळे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही १०५ आहोत. तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं. यामागील कारण म्हणजे खरी शिवसेना आमच्यासोबत आल्याचं आम्हाला समाधान आहे, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानेच भाजप सत्तेत असल्याचं त्यांनी विसरू नये. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला महाराष्ट्रातील सत्ता शिंदेंमुळे मिळाली आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत हेखरे, तसेच त्यांच्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ही निश्चित आहे.

 

मात्रहे सुद्धा तितकेच खरे आहे की,एकनाथ शिंदेंनीच उठाव केला नसता तर१०५ आमदार असूनही अजूनपर्यंतविरोधातच बसावं लागलं असतं.यामुळे सत्य हेच आहे की,ते शिंदेंमुळे सत्तेत आले आहेत अन् त्यांच्यामुळे शिंदे सत्तेत आहेत.

IPL_Entry_Point