मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  maharashtra cabinet decisions : पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका

maharashtra cabinet decisions : पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 13, 2024 07:09 PM IST

Maharashtra Cabinet decision news : राज्यातील महायुती सरकारनं पोलीस पाटील व आशा सेविकांच्या (Asha Workers) मानधनात भरीव वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा धडाका
पोलीस पाटील, आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा धडाका

Maharashtra Cabinet decision news : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाकाच लावला आहे. राज्य मंंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्ब्ल २८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आशा स्वयंसेविका व पोलीस पाटलांचं मानधन वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यात विविध विभागांशी संबंधित निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आजच्या निर्णयानुसार, यापुढं पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर, आशा सेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय

> पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार

> आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

> मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

> अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता

> पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

> मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

> केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता

> श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार

> कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

> भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

> राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

> महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, नफ्यात आणणार

> मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार

> मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार

> शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. 

> मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

> आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

> कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

> शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार. ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

> पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

> म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

> मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.

> उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

> मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार

> भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

> महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

> जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

> दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना

WhatsApp channel