मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde Vs Shivsena: तर विधानसभेत आत्महत्या करेन, शिंदे गटाची साथ सोडणाऱ्या आमदाराचा इशारा

Shinde Vs Shivsena: तर विधानसभेत आत्महत्या करेन, शिंदे गटाची साथ सोडणाऱ्या आमदाराचा इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 19, 2022 11:16 AM IST

Shinde Vs Shivsena: महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं हे षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू होतं. हे आताचं षडयंत्र नव्हतं असा दावाही आमदार नितीन देशमुख य़ांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Shinde Vs Shivsena: राज्यात शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर सत्तांतर झाले. यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. सत्तांतरावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे गटाचे आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. तेव्हा शिंदे गटातून परतलेले आमदार नितीन देशमुख यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात झालेलं सत्तांतर हे पैशांच्या मदतीने झालं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच हे मी सिद्ध करू शकलो नाही तर राज्याच्या विधानसभेत आत्महत्या करेन असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं हे षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू होतं. हे आताचं षडयंत्र नव्हतं. माझ्यावर त्यांनी पुन्हा चुकीची कारवाई केली तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. महाराष्ट्रात त्यांनी सत्तांतर घडवले. शिवसेनेच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांच्या क्लीप्स माझ्याकडे आहेत असेही नितीन देशमुख यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे भेटत नसल्याची तक्रार करतात. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती. त्यांचे विचार आम्हाला वाचवायचे होते असं काही नेते सांगतात. पण त्यांच्या आवाजाची क्लिप बाहेर काढली तर सत्य समोर येईल. राज्यात पैसे घेऊन सत्तांतर झालंय, हे सिद्ध करू शकलो नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या