मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : त्या १५ आमदारांच्या घराला केंद्राचं संरक्षण
१५ आमदारांच्या कुटुंबाला मिळणार केंद्राचं संरक्षण
१५ आमदारांच्या कुटुंबाला मिळणार केंद्राचं संरक्षण (हिंदुस्तान टाइम्स)
26 June 2022, 13:35 ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 13:35 IST

शनिवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातल्या १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

Maharashtra Political Crisis : राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे समर्थक (Eknath Shinde) आणि शिवसैनिक यांच्यात वाद विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांच्या (MLA) कुटुंबियांना धोका असल्याचं सांगितलं होतं. आपल्या आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत घट केल्याचाही बंडखोर आमदारांचा आरोप होता. त्यावेळेस राज्य सरकारने (State Government) आमदारांच्या सुरक्षेत कोणतीही कपात केली नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सध्या हाती येत असलेल्या माहितीनुसार आता मात्र केंद्र सरकारने या १५ बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याचं मंजूर केलं आहे. त्यानुसार पंधरा आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचं कामही सुरु झालं आहे.  एकनाथ शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून (Central Ministry) सुरक्षा पुरवल्याचं स्पष्ट केलं आहे. आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarwankar ) यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शनिवारी झालेल्या तोडफोड किंवा कार्यालयांवर दगडफेकीच्या घटनांनतर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. शनिवारी एकनाथ शिंदे गटातल्या १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. 

रविवारी संध्याकाळपर्यंत सर्वच १५  आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात केले जातील अशी सूत्रांची माहिती आहे.  आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर मात्र सीआरपीएफचे जवान तैनात केले गेले आहेत. दादर परिसरात राहणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये CRPFचे जवान दाखल झाले आहेत.

राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतलं असा आरोप आरोप बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी केला होता. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीचे माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला होता.