मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satara: साताऱ्यासाठी शिंदे गटाची मोर्चेबांधणी; पुरुषोत्तम जाधव यांचा भेटीगाठींचा सपाटा

Satara: साताऱ्यासाठी शिंदे गटाची मोर्चेबांधणी; पुरुषोत्तम जाधव यांचा भेटीगाठींचा सपाटा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 01, 2022 02:33 PM IST

Purushottam Jadhav: सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे गटाकडं राहावा, असा प्रयत्न शिंदे गटानं सुरू केला आहे. त्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.

Purushottam Jadhav -Som Parkash
Purushottam Jadhav -Som Parkash

Satara Politics: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष २०२४ च्या तयारीला लागला असून केंद्रीय नेतृत्वानं राज्यात विभागवार निरीक्षक पाठवले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे गटही सक्रिय झाला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कुठल्या जागांवर दावा करायचा यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. साताऱ्यातील शिंदे गटाचे शिलेदार पुरुषोत्तम जाधव यांनी यासाठी भेटीगाठींचा सपाटा सुरू केला आहे.

सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळं या जिल्ह्यावर त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडू नये याची काळजी मुख्यमंत्री घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाप्रमुख म्हणून पुरुषोत्तम जाधव यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर जाधव यांनी जिल्ह्यात संपर्काला आणि कामांना धडाक्यात सुरुवात केली आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक दोन वेळा लढवली होती. आगामी निवडणुका भाजपसोबत युती म्हणून लढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळं पूर्वीपासून शिवसेनेकडं असलेला सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडंच राहावा असा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांचीही पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत शिरवळ ते पुणे असा प्रवासही केला. या भेटीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची माहिती सोम प्रकाश यांना दिली. तसंच, अन्य विकासकामांबाबतही चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यावर भाजपनंही लक्ष केंद्रित केलं आहे. भाजपचे पदाधिकारी देखील साताऱ्याच्या बाबतीत वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जाधव यांनी अलीकडंच नागपूर इथं जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली होती. युती म्हणून निवडणूक लढवायची असल्यानं स्थानिक नेत्यांकडून एकतर्फी वक्तव्यं केली जाऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी बावनकुळे यांच्या भेटीत व्यक्त केली.

prashant bamb: शिक्षक, पदवीधर मतदारसंघच बंद करा; आमदाराच्या मागणीनं राजकीय वर्तुळात खळबळ

IPL_Entry_Point