राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी

राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी

Updated Oct 14, 2024 02:55 PM IST

Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफी करण्यात आली.

मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना टोल माफी
मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना टोल माफी

Maharashtra Cabinet Meeting decision Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने १९९५ ते १९९९ या काळात बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांसाठी ४५ रुपये टोल आकारला जात होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली. दरम्यान, २००० सालापासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. मात्र, आज रात्री १२.०० वाजल्यापासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. दररोज साधारण सहा लाख वाहने मुंबईत ये-जा करतात. मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे लाखो वाहन चालकांना फायदा होणार आहे. मात्र, जड वाहनांना टोल माफी नसेल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले इतर निर्णय

- आगरी समाजासाठी महामंडळाची घोषणा

- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविणार

- पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

- ‘उमेद’साठी अभ्यासगट

- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

महिन्याभरात १६५ हून अधिक निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने महिन्याभरात १६५ हून अधिक निर्णय घेतले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर