उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने १४ वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला.
काँग्रेसवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर लोकांच्या मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीपोटी ते हिंदुत्वाला विरोध करत असतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते म्हणाले की, मला आनंद आहे की, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर निर्माणाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली. यावेळी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर असून त्यांचे अयोध्येत भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामलल्लाची आरती केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणकार्यात ज्या लोकांनी अडथळा आणला त्यांना घरी बसावे लागले आहे.