देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंगवर ठेवलं जातआहे. त्यांनाराज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपमधूनच नेतेसक्रिय झाले आहेत.असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून वेटींगवर ठेवले जाते आहे. आपण जर बघितले तर नवनीत राणा यांना एका तासात भेट मिळते, तिथे दोन दोन दिवस देवंद्र फडणवीस यांना वेटींगवर ठेवले जात असल्याचं अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला आत्ता जी माहिती मिळते आहे,त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपच स्वतः सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भाजप सक्रिय होवून भाजपमधीलच काही लोक गडकरी साहेबांचे नाव पुढे आणत आहेत. काही लोक विनोद तावडे यांचे नाव पुढे आणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी अनेक कुलुप्त्या करत आहेत. सुषमा अंधारे यांच्यादाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अंधारे म्हणाल्या की,फडणवीस यांनी स्वतः राज्यात भस्मासुर वाढवला आहे. आता तो भस्मासुर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवले की काय अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले,तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अनेक कुल्पत्या सुरू आहेत. हे आता बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आले आहे.
महायुतीवर टीका करताना अंधारे म्हणाल्या की, सध्या महायुतीचे ग्रहमान चांगले नाही. ते काहीही करायला गेले तर त्याच्या उलट होते. रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेची जोरजोरात जाहिरात केली गेली. त्यासाठी वारेमाप पैसा उधळला गेला. जसे एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे वावर विकून लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहे. देवेंद्र फडणवीस आपला रेशीम बागेतील बंगला विकूनच पैसे खर्च केले की काय असे वाटत आहे. मात्र लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरु असताना बदलापूरची घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. महायुतीची नियत चांगली नसल्याने त्यांच्या उलट घटना घडत आहेत.
अंधारे म्हणाल्या की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर आम्ही जे प्रश्न विचारले ते जसेच्या तसे कोर्टानेही उपस्थित केले. अक्षय शिंदे कोणी साधुसंत नव्हता, तो मरायलाच पाहिजे होता. मात्र, त्याला अशा पद्धतीने एन्काऊंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता येतात राहिले.
बदलापूर अत्याचार प्रकरणात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, ही घटना ज्या शाळेमध्ये घडली तेथे चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि मानवी तस्करी होत होती. या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे. त्याला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला. जर कोणी याला नैसर्गिक न्याय म्हणत असतील तर पूजा चव्हाण प्रकणातील आरोपीला आणि विनेश फोगाटच्या आरोपीला गोळ्या घालाव्या लागतील.