मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो, आदित्य ठाकरेंचा इशारा

Eknath Shinde : एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो, आदित्य ठाकरेंचा इशारा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 26, 2022 08:05 AM IST

भाजपची (BJP) नजर मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) आहे. एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून (Worli) जातो हे विसरू नका. बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे (हिंदुस्तान टाइम्स)

मुंबईतल्या लाला लजपतराज महाविद्यालयात  झालेल्या एका सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांना एक इशारा दिला आहे. भाजपची मुंबई महापालिकेवर नजर आहे हे संपूर्ण राज्याला ठावूक आहे. मात्र शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत भाजपला मुंबई महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यापासून रोखतील असा विश्वास आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी व्यक्त केला आहे.

आमच्याकडे आता जे कार्यकर्ते आहेत ते आता आमचे विजयाचे नवे उमेदवार असतील असं आदित्य ठाकरे म्हणालेत.ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी आधी राजनामे द्यावेत राजीनामे दिल्यावर निवडणूक जिंकून दाखवावी असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आता शिवसेना या बंडखोरांना माफ करणार नाही असं सांगतनाच आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना एक निर्वाणीचा इशाराही दिला आहे. भाजपची नजर मुंबई महापालिकेवर आहे. एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो हे विसरू नका. बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यात सध्या जे वातावरण सुरु आहे ते पाहाता आपल्याला धक्का बसला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आपण त्यांना काय कमी पडू दिलं किंवा देण्यात चुकलो हे समजत नाही', असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी दिली. सत्तेचा मोह नसलेला मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे.हे सारं असतानाच या बंडखोरांचं बंड हे समजण्यापलिकडचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

लाला लजपतराय महाविद्यालयात बोलताना आदित्य ठाकरे यांनी या आमदारांचा उल्लेख सेनेतली घाण असा केला आहे. शिवसेनेतून घाण गेली आहे. काळाच्या ओघात माणसं कशी बदलतात हे आपण पाहिलं आहे. सध्या सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेकडे लागल्या आहेत. पण आजपर्यंत जे काही केले ते महाराष्ट्रासाठी केले. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे शब्द देतात ते पूर्ण करतात. ते आपल्या लोकांची काळजी घेतात. आम्ही प्रत्येक शिवसैनिकाला दिलेले वचन पूर्ण करतो. आता जे होईल ते चांगलेच होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

WhatsApp channel