Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार, मुलगी काय करणार? रोहिणी खडसेंनी स्पष्ट सांगितलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार, मुलगी काय करणार? रोहिणी खडसेंनी स्पष्ट सांगितलं

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार, मुलगी काय करणार? रोहिणी खडसेंनी स्पष्ट सांगितलं

Apr 06, 2024 11:30 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांची गुलगी रोहिणी खडसे काय करणार, याची चर्चा सुरू झाली होती. यावर रोहणी खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहिणी खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रोहिणी खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ खडसे भाजपात परतणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. मात्र आता स्वत: आपण भाजपात जात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे दिल्लीला गेला होते. कोर्टात केसची तारीख असल्यामळे आपण दिल्लीला गेल्याचे नाथाभाऊंनी सांगतले. मात्र त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत.

दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांची मुलगी काय करणार, याची चर्चा सुरू होती. यावर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबतच राहणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी लिहिले की, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे,मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे,लढेंगे और जितेंगेअसं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खडसे साहेब भाजपात जात आहेत, या चर्चेची मला माहिती नाही. खडसे साहेबांची तब्येत बरी नाही, माझे रोहिणी ताईंशी सकाळी बोलणं झाले आहे. हॉस्पिटल आणि स्ट्रेसमुळे खडसेंची तब्येत ठीक नाही,  त्यांच्या बोलण्यावरून तसं काही वाटलं नाही,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर खडसे यांची पक्षातील ताकद कमी होत गेली व ते अडगळीत गेले. दाऊदशी फोनवरून संवाद साधल्याच्या प्रकरणात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन विजनवासात जावे लागले होते. त्यानंतर फडणवीस व त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्यावर त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत आल्यानंतर शरद पवारांनी खडसेंनी विधानपरिषदेची उमेदवारी देत राजकीय पुनर्वसन केले होते.

 

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा फास खडसे कुटुंबाभोवती आवळत चालला असल्याने खडसेंनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर