मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 25, 2023 08:48 AM IST

Eknath khadse and Mandakini Khadse : भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Eknath khadse and Mandakini Khadse
Eknath khadse and Mandakini Khadse

मुंबई : पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्या प्रकरणी गोत्यात आलेले एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पुण्यातील पुण्यातील भोसरी येथे मोठा भूखंड घोटाळा पुढे आला होता. यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचे नाव पुढे आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन कोर्टात याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अटकेची टांगती तलवार खडसे यांच्यावर होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अंतरिम जामीन १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. टया आधी मुंबई उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला होता.

भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होणार अशी चर्चा होती. या निर्णया विरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणात सहकार्य करणार आणि चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांनाही दिलासा देत कोर्टाने त्यांना देखील जमीन मजूर केला होता.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३.१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले होते, मात्र आता पुन्हा हे प्रकरण पुढे आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते.

WhatsApp channel