“देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा-eknath khadse big claim about devendra fadnavis that committed for governor post ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

“देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

Sep 13, 2024 07:25 PM IST

Eknath khadse : देवेद्र फडणवीसांनी मला आश्वास दिले होते की, राज्यपाल पदासाठी ते माझ्या नावाची शिफारस करतील. त्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचीही शपथ घेतली होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

फडणवीसांबाबत एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा
फडणवीसांबाबत एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा खुलासा करत म्हटले आहे की, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून घरी बोलावले व त्यांना राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. विशेष म्हणजे फडणवीस यांनी यासाठी आपल्या मुलीची देखील शपथ घेतली होती. एकनाथ खडसे यांना राज्यपालपद देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता,असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, साधारण २०१९ मधील हीगोष्ट आहे.एकेदिवशी मला देवेंद्र फडणवीसांनी बोलावले होते. त्यावेळी आम्ही दोघेच होतो. तेव्हा फडणवीस मला म्हणाले की, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो. त्यावर मी म्हणालो की, देवेंद्रजी तुम्ही  मला अनेकदा  सांगितले की हे करणार, ते करणार, हे देणार वगैरे. पण, अजूनपर्यंत काहीच मिळाले नाही.राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे. पण माझा यावर विश्वास बसत नाही, असे त्यांना सांगितले. यावर, ते म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा माझा शब्द आहे. मात्र पुढे काय झाले अजून समजले नाही. मात्र मला फडणवीसांनी हे आश्वासन दिले होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपामध्ये जाण्यावर जवळपास फुली मारली आहे. ज्या वेळेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीतील अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत असताना जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. रक्षा खडसे उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात भाजपाचा मफलर घातला. या घटनेला ५ ते ६ महिने होऊन भाजपाने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

एकनाथ खडसे म्हणाले, लोकसभेच्या आधीमी ज्यावेळेस भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझे मन भाजपात सहभागी होण्यास धजत नव्हतं. दिल्लीतील भाजपच्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन करून दिल्लीत बोलावलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माझा भाजपात प्रवेश झाला. तेव्हा खासदार रक्षा खडसेही तेथे उपस्थित होत्या. एका कार्यक्रमात माझ्या गळ्यात भाजपचा गमछा टाकून प्रवेश देण्यात आला. मात्र या घटनेला ५ ते ६ महिन्यांचा काळ लोटूनही भाजपने माझ्या पक्षप्रवेशाची घोषणा केली नाही. मी अजूनही वाट पाहत आहे, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. राज्यातील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

 

मी भाजपात प्रवेश घेतो असे कधी म्हणालो नव्हतो. मला दिल्लीतून फोन आल्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन गेलो होतो. ४० वर्षे भाजपचं काम करताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे पुन्हा मला भाजपात प्रवेश द्या, अशी विनंती करणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे, अशी खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

Whats_app_banner