CM Eknath Shinde Pune visit : ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला प्रतिसाद-eknath kaka build the wall the chief minister granted the demand of boy anvit in pune ekata nagar visit ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde Pune visit : ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला प्रतिसाद

CM Eknath Shinde Pune visit : ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला प्रतिसाद

Aug 06, 2024 02:21 PM IST

CM Eknath Shinde Pune visit : पुण्यात पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भेट दिली. एकता नगर परिसरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी एका चिमूकल्याने हातात पोस्टर घेऊन केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला.

 ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिली साद
‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिली साद

CM Eknath Shinde Pune visit : पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणे भरली. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सिंहगड रस्त्यावरील एकता नगर भागात पाणी घुसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एकता नगर भागाला सोमवारी भेट दिल्या. त्यांच्या भोवती नागरिकांचा गराडा होता. प्रत्येक जण आपली समस्या सांगत होता. येथेच राहणाऱ्या एका चिमूकल्याने देखील बाबाच्या खांद्यावर बसून आपली समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, गराड्यात त्याचा आवाज मुख्यमंत्री शिंदे यांच्या पर्यंत पोहोचत नव्हता. मात्र, त्याच्या हाती असलेल्या 'एकनाथ काका भिंत बांधून द्या' या बोर्डाने शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्या चिमूकल्याला बोलवत त्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

पुराच्या पाण्यामुळे एकता नगर भागात मोठे नुकसान झाले. या भागात पाणी साचल्याने पुण्यातील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला. याच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकता नगरला भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे येताच त्यांच्याभोवती नागरिकांची गर्दी जमली. सगळेजण त्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी पुढे जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरग्रस्त भागातील माहिती जाणून घेत असतांना अन्वित हा लहान मुलगा देखील त्याची समस्या सांगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण्यासाठी त्यांना आवाज देत होता.

‘एकनाथ काका....एकनाथ काका' म्हणून तो त्यांना आवाज देत होता. मात्र, त्याचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत नव्हता. पण त्याच्या हातातील पोस्टरने मात्र, मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं ‘एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या...’ म्हणून अन्वितच्या हातातील पोस्टरने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. हे पोस्टर पाहून त्यांनी अन्वित व त्याच्या बाबाला पुढे बोललं त्याचा हात हातामध्ये घेत तुमच्या सोसायटीत पाणी आलं होतं का? असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर अन्वितनं सोसायटीत खुप पाणी आल्याचं सांगितलं. तुम्ही काही काही तरी करा, असं देखील अन्वितनं मुख्यमंत्र्यांना म्हणत त्यांना विनंती केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन अन्वितला दिलं व पुढील नागरिकांशी बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर एकता नगरीतील नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्वितचा उल्लेख केला आणि येथील नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

अन्वित मंडावले असे या मुलाचे पूर्ण नाव आहे. तो एकता नगरीतील राधाकृष्ण सोसायटीत राहत असून सध्या तो सीनिअर केजीमध्ये शिक्षण घेत आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने एकता नगरीत सलग दोनदा पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. सोसायट्यांमध्ये राहणार्‍या लहाणग्यांपासून सवार्र्ंचेच जनजीवन विस्कळीत झाले.

विभाग