Nagpur crime : बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मोठे आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ही घटना ताजी असतांना आता नागपुरात देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. येथील कामठी भागात ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारच्याने मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
धनीराम वासनिक (वी ५५) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, नागपूर येथील कामठी भागात आरोपी धानिराम वासनिक राहतो. पीडित मुलगी ही त्याच्या शेजारी राहते. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरी नेले. या ठिकाणी तिला चॉकलेट देत त्याने तिच्यावर अत्याचार केला. या यानंतर त्याने मुलीला चाकूचा धक दाखवून हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी ही घाबरून घरी पळाली.
यानंतर मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग आईला सांगितला. आईने तातडीने मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेतली. त्यांनी तातडीने या प्रकरणी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी या प्रकरणाचा कामठी पोलिस तपास करत आहेत.
नागपूर येथे स्वस्तात गुप्तधन देण्याच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याची ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपूर येथील गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरेश गुल्हाने व शुभांगी गुल्हाने (नांदगाव, खंडेश्वर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या नवरा बायकोचे नाव आहे. ते नांदगावमध्ये भाजीपाल्याचे दुकान चालवितात. तिघांनी त्यांना गुप्तधन स्वस्त:त विकायचे आहे अशी बतावणी करून त्यांची फसवणूक केली.