आईनं दुसरं लग्न केलं, वडिलांनी नातं तोडलं! भाईंदरमध्ये ८ वर्षांच्या मुलानं पालकांच्या विरहात संपवलं जीवन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आईनं दुसरं लग्न केलं, वडिलांनी नातं तोडलं! भाईंदरमध्ये ८ वर्षांच्या मुलानं पालकांच्या विरहात संपवलं जीवन

आईनं दुसरं लग्न केलं, वडिलांनी नातं तोडलं! भाईंदरमध्ये ८ वर्षांच्या मुलानं पालकांच्या विरहात संपवलं जीवन

Published Oct 10, 2024 02:45 PM IST

Eight year old child commit suicide : भाईंदरच्या उत्तन येथून एक धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. आठ वर्षांच्या चिमुकल्यानं आई वडिलांच्या विराहात विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे.

आईनं दुसरं लग्न केलं, वडिलांनी नातं तोडलं! भाईंदरमध्ये ८ वर्षांच्या मुलानं पालकांच्या विरहात संपवलं जीवन
आईनं दुसरं लग्न केलं, वडिलांनी नातं तोडलं! भाईंदरमध्ये ८ वर्षांच्या मुलानं पालकांच्या विरहात संपवलं जीवन

Eight year old child commit suicide : ‘आई मला घरी घेऊन चल, मला इथे रहायचं नाही..’ अशी आर्त साद घालणार्‍या अनाथाश्रमातील ८ वर्षाच्या मुलाला आईचा विरह सहन न झाल्याने त्याने विहिरीत उडी मारून जीनव संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भाईंदरच्या उत्तन परिसरातील केयरींग हँड्स सेवा कुटीर नावाच्या संस्थेत घडली.

आरमान अब्दुल सय्यद (वय ८) असे या मुलाचे नाव आहे. त्याला तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईने त्यांना तीन महिन्यांपूर्वी भाईंदरच्या उत्तन परिसरातील केयरींग हँड्स सेवा कुटीर संस्थेत दाखल केले होते. त्याच्या आई वडिलांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे झाले होते. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला नाकारले तर आईने देखील दुसरे लग्न केल्याने तिने आरमानला अनाथ आश्रमात ठेवले होते. तो तीन महिन्यांपासून या आश्रामात राहत होता. या आश्रमात २१ अनाथ मुले आहेत. त्याची आई त्याला अधून मधून या आश्रामत भेटायला येत होती. 

यावेळी आई मला इथे नाही राहायचे आहे. मला इथून घेऊन चल. मला तुझ्याजवळच रहायचं आहे, असं तो आईला सारखा रडत होता. मात्र, त्याच्या आईने दुसरे लग्न केले होते. ती तिच्या दुसऱ्या पती सोबत नालासोपारा येथे राहत होती. त्यामुळे तिने त्याला आश्रमातच ठेवले. ही बाब जेव्हा आरमानला कळली तेव्हा तो खून दु:खी झाला होता. 

तो नौराश्यात गेला होता. मंगळवारी आश्रामत सर्व जण झोपले असता त्याने रातीच्या सुमारास आश्रामात असलेल्या एका विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. सकाळी जेव्हा सर्व उठले तेव्हा ही घटना लक्षात आली. आश्रमच्या संचालकांनी याची माहिती ही पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह भाईंदर पच्छिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं पुढं आलं आहे. त्याचा मृतदेह त्याच्या आईला सोपवण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर